आरमोरी :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार मोहझरी येथील दोन तरुण कुरखेडा तालुक्यातील गांगुली इथे कोंबडे बाजारला गेले होते. सदर तरुण वापस येत असताना सायंकाळच्या सुमारास कराडी- पाठनवाडा रस्त्यांच्या मधोमध त्यांच्या दुचाकीचा सायंकाळी अपघात झाला.
सदर अपघात झालेल्या मोहझरी येथील तरुणांचे नाव गणेश सुधाकर भेंडारे (वय 25) व एकनाथ नामदेव गुरनुले (वय 35) असे आहेत. या अपघातात दोघांच्याही पायाला जबर मार बसल्यामुळे ते जखमी अवस्थेत तिथेच पडून होते.
ही माहिती नागरिकांना कळताच घटनास्थळी धाव घेतली व दोघांनाही तात्काळ आरमोरी येथील शासकीय दवाखान्यात हलवण्यात होते पण आताच मिळालेल्या माहितीनुसार गणेश सुधाकर भेंडारे या तरुणाच्या पायाला खूप मार आणि पायाचा हाड
चेंदामेंदा होऊन मोडल्यामुळे नागपुर येथील दवाखान्यात रेफर करण्यात आल्याची माहिती सुकाळा येथील भारत भैसारे यांनी दिली ते रुग्णसोबत आहेत.
तर एकनाथ नामदेव गुरनुले यांची प्रकृती ठिक असल्यामुळें त्याला आरमोरी येथील शासकिय दवाखान्यात ठेवण्यात आले आहे. हा अपघात नेमका कश्यामुळे घडला याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.
Armori:- According to the information received, two young men from Mohazri had gone to the chicken market in Ganguli of Kurkheda taluka. While the said young man was returning, his two-wheeler met with an accident in the middle of the Karadi-Pathanwada road in the evening.
The names of the youths of Mohazri who were involved in the said accident are Ganesh Sudhakar Bhendare (age 25) and Eknath Namdev Gurnule (age 35). In this accident, both of them were lying there in an injured state as their legs were hit hard.
As soon as the citizens came to know this information, they rushed to the spot and both of them were immediately shifted to the government hospital in Armory, but according to the information received just now, Ganesh Sudhakar Bhendare suffered a lot of injuries on his leg and leg bone.
Bharat Bhaisare from Sukala informed that he was referred to a hospital in Nagpur due to a broken ankle. He is with the patient.
While Eknath Namdev Gurnule is in good health, he has been kept in the government hospital in Armori. There is no official information about the exact cause of the accident.