बेतकाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी रामन विज्ञान केंद्राची घेतली भेट | Batmi Express

Be
0

 

Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Bus,Korchi,Gadchiroli Batmya,

  • महाराज बागेतील प्राण्यांविषयी जाणून घेतली माहिती

कोरची:- तालुका मुख्यलयापासुन दहा कि.मी.अंतरावर असलेल्या  धनंजय स्मृती माध्यमिक व उच्चमाध्यमीक विद्यालय, बेतकाठी येथे शिकत असलेले आदिवासी व ग्रामीण भागातील एकुण पन्नास विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस.सी. रामटेके सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी नागपूर येथील विज्ञान रमन केंद्राला भेट देऊन विज्ञानाचे प्रात्यक्षिक व  अवकाशीय तारामंडळ याचे प्रत्यक्ष अनुभव घेतले.

नंतर नागपूर नगरातील  महाराज बाग प्राणी संग्रहालय येथे जाऊन विविध प्राणी, पक्षी व जलचर प्रान्यांविषयी माहिती जाणून घेतली. तसेच प्रसिद्ध पर्यटन स्थळ बौद्ध धर्माचे धार्मिक स्थळ दीक्षाभूमी येथे जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना नमन केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथील प्रेक्षकगृहात जाऊन विमान कसे उळतात व उतरतात याचे विलोभनीय दृश्य विद्यार्थ्यांनी अनुभवले. जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोशीऐशन न्यू व्हीसीए क्रिकेट मैदान, विश्व शांती सरोवर ब्रम्हकुमारी म्युझियम व मेट्रो प्रवास याचे प्रत्यक्ष अनुभव घेतले. यावेळी विद्यार्थ्यांसोबत विद्यालयाचे शिक्षक श्री,व्ही.बी.कोरेटी, श्री,एच.एच.बिसेन, श्री,टि.एस.पुस्तोडे,श्री,महेश खुने, श्री, ठाकुरराम कुंजाम हे होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->