दिनेश बनकर - आरमोरी/देऊळगाव: ०७/०१/२०२३ रोजी : आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण महामंडळाच्या खात्या विषयी काहीना काही ऐकत असतो, तर त्याच प्रकारे आज एक घटना समोर आली. महात्मा फुले तथा कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव येथील शाळेचे मुलं-मुली दररोज महामंडळाच्या बसने प्रवास करतात. शाळेची सुट्टी झाली आणि मुला मुलीं आपल्या परतीच्या प्रवासाला बस स्टॉपयेऊन बस ची वाट पाहत बसले होते. रोजच्या नियमानुसार एक लोकल बस येऊन देऊळगाव च्या बस स्टॉप ला थांबली असताना मुला - मुलांची गर्दी खूप जास्त असल्यामुळे त्या बसमध्ये जागा अपुरी पडली. ही गोष्ट लक्षात न घेता गाडीच्या बस चालकाने खाली उतरून एका मुलीला रागामध्ये येऊन तिच्या अंगावर हात उचलला आणि तिला मारहाण केली. त्या अचंबित करणाऱ्या प्रकारामुळे ती मुलगी खूप रडायला लागली. तेथील ही बाब लक्षात येताच देऊळगाव येथील लोकांनी त्या बस चालकावर लोक रागावून गेले. तेथील लोकांचे म्हणणे न ऐकता त्या बस चालकाने गाडी सुरु करून गडचिरोली ला निघून गेला. तेथील लोकांची मागणी अशी होती की, त्या चालकाने त्या मुलीची माफी मागावी पण लोकांच्या भावना न समजून घेता आणि माफी न मागता सरळ निघून गेला. या कारणामुळे तेथील लोकांच्या मनामध्ये आक्रोश निर्माण झाला.
आरमोरी: बस चालकाने केली मुलीला मारहाण | Batmi Express

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.