तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

देसाईगंज तालुक्यातील नवीन शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित | Batmi Express

wadsa,Wadsa News,Desaiganj,Desaiganj News,Gadchiroli,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,
wadsa,Wadsa News,Desaiganj,Desaiganj News,Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,

  • अनेक वर्षांपासून नवीन कार्डधारक अन्नधान्य मिळण्याच्या आशेवरच

प्रतिनिधी / देसाईगंज : तालुक्यातील नवीन शिधापत्रिकाधारक गेले दीड ते दोन वर्षांपासून लाभापासून वंचित असून अनेक रेशन दुकानातील अन्नधान्य मिळण्याच्या  शिधापत्रिकाधारक अन्नधान्य मिळण्याच्या आशेवरच असल्याने नवीन शिधापत्रिका धारकातील कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरकुलाचे लाभ मिळण्याकरिता व इतर कामाकरिता अनेक सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांनी देसाईगंज तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी वेगळ्या नवीन शिधापत्रिका काढून घेतल्या आहेत. नवीन शिधापत्रिका काढून काही शिधापत्रिका धारकांना जवजवळ दीड ते दोन वर्ष लोटूनही रेशन दुकानातील अन्नधान्याचा लाभ मिळत नसल्याने अजून किती दिवस अन्नधान्यासाठी वाट बघावी लागणार?

असा प्रश्न अनेक नवीन शिधापत्रिकाधारकांना पडलेला आहे:

काही शिधापत्रिका धारकांना कार्डाचे आर.सी. क्र. मिळूनही लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. दगदगीच्या जीवनशैलीमध्ये दररोज मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे व पोटाची खळगी भरणारे अनेक कुटुंबे आहेत. काही शिधापत्रिका धारक भूमिहीन असून रोजगाराच्या संधी शोधून संसाराचा गाडा हाकण्याच्या तयारीत असून रोजगार मिळेनासा झाला आहे, अशातच अन्नधान्य मिळत नसेल तर काय करावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही कुटुंबांना कार्डचे आर. सी. क्रमांकही मिळाले, मात्र कितीतरी वर्षांपासून रेशन दुकानातून अन्नधान्य मिळत नसल्याने कुटुंबातील सदस्यांवर उपासमारीची पाळी येणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासन स्तरावरून अन्न सुरक्षा योजने अंतर्गत ग्रामीण भागात ४५ हजाराच्या आत उत्पन्न असणारे लाभार्थी तर शहरी भागात १ लाख ५० हजाराच्या आत उत्पन्न असणारे लाभार्थी निवड करून प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचा लाभ दिला जातो. मात्र दीड ते दोन वर्ष लोटूनही अन्नधान्याचा लाभ मिळत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांनी काय करावे? असा विचार सर्वसामान्यांच्या मनात घर करून सोडत आहे.


Representative / Desaiganj: The new ration card holders in the taluka have been deprived of benefits for the last one and a half to two years and the families of the new ration card holders are facing difficulties as the ration card holders are still hoping to get food grains from many ration shops. Many ordinary family members have taken separate new ration cards not only from Desaiganj taluka but also from the entire district to get gharkula benefits and for other work. How many more days will the ration card holders have to wait for food grains as they are not getting the benefits of food grains from the ration shop even after one and a half to two years after taking out new ration cards?

This is the question many new ration holders are asking:

Some ration card holders will get RC of the card. No. It is seen that there is no benefit. In Dagdagi lifestyle, there are many families who support their family by daily wage labor and fill their stomach. Some of the ration card holders are landless and are ready to leave the world by looking for employment opportunities and are unable to get employment, what to do if they are not getting food grains? Such a question is being raised. Some families have R of the card. C. The numbers were also received, but since food grains are not available from the ration shop for many years, will the family members face starvation or not? Such a question has arisen.

Under the food security scheme from the government level, beneficiaries with income within 45 thousand in rural areas and beneficiaries with income within 1 lakh 50 thousand in urban areas are given the benefit of Priority Family Beneficiary Scheme. But what should ordinary citizens do if they do not get the benefits of food grains even after one and a half to two years? Such a thought is leaving a home in the minds of common people.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.