तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

HSC Exam: बारावीच्या परीक्षांसदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय | Batmi Express

HSC 2023 Exam,HSC 2023,HSC 2023 Exam News,HSC Exam,Education

HSC 2023 Exam,HSC 2023,HSC 2023 Exam News,HSC Exam,Education

मुंबई बारावीच्या परीक्षांचे (HSC Exam) अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत होणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक बातमी समोर आली आहे. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सराव परीक्षांशिवाय अंतर्गत गुण नाही : बारावीच्या विद्यार्थ्यांना आता सराव परीक्षा दिल्याशिवाय अंतर्गत गुण मिळणार नाहीत, असा निर्णय शिक्षण मंडळाने घेतलाय. त्यामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे. परीक्षेची भीती नाहीशी व्हावी, विद्यार्थ्यांचा मुख्य परीक्षेच आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि लिखाणाचा सराव वाढवा या हेतून विभागीय शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा अनिवार्य केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणदान केले जाणार आहे.


कोरोना काळातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा : सध्या बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी हे कोरोना काळातील आहेत. २०२१ मध्ये कोरोना काळात दहावीला असतानाही या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष परीक्षा देखील झाली नव्हती. अभ्यास क्रमात २५ टक्के कपात करत शिक्षण मंडळाकडून विषय निहाय अभ्यासक्रम दिला आहे. मात्र बोर्डाच्या मुख्य परीक्षांआधी सराव परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांना घाम फुटला आहे. त्यामुळे परीक्षेची भीती नाहीशी व्हावी आणि त्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि लिखाणाचा सराव वाढवा या हेतूने विभागीय शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा अनिवार्य केली आहे. या सराव परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण मिळणार असल्याने त्यांना मोठा फायदा होणार आहे. याबाबतचा निर्णय विभागीय शिक्षण मंडळाने संभाजीनगर अखत्यारीत येणाऱ्या पाचही जिल्ह्यांना अनिवार्य करण्यात आला आहे. सराव परीक्षा घेऊन या परीक्षेतील मूल्यांकना नुसार वार्षिक परीक्षेसाठी अंतर्गत गुणदान करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. संभाजीनगर आणि परिसरातून या सराव परीक्षांना चांगला प्रतिसाद मिळत असून ५८ हजार विद्यार्थ्यांपैकी ५६ हजार ७०० विद्यार्थी सराव परीक्षा देत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.