देलनवाडी:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरमोरी (Armori ) तालुक्यातील देलनवाडी- मानापुर रोडवर बाजूला असलेल्या धाईत राईस मिल जवळ तरुणाने टेम्पोला जबर धडक दिली. तरुणाचे नाव निखिल घनश्याम ठाकरे (25) रा . मानापूर असं आहे. आज सायंकाळी अंदाजे 5.30 वाजताच्या सुमारास टेम्पोला जबर धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.
सदर तरुण दुचाकीने देलनवाडी वरून मानापुर कडे जात होता तर टेम्पो मानापुर वरुन देलनवाडी येत असताना समोरासमोर दोन्ही वाहनाची जबर धडक बसली. या धडकेत दुचाकी वाहन चालविणारा निखिल ठाकरे या तरुणाच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याचे घटनास्थळी दिसत आहेत.
या घटनेची गावातील नागरिकांना तात्काळ माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर तरुणाला डोक्याला मोठ्या प्रमाणात मार बसल्यामुळे त्याला गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयामध्ये हलवल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.
Delanwadi:- According to the information received, the youth hit the tempo near Dhait Rice Mill on Delanwadi-Manapur road in Armori taluka. The young man's name is Nikhil Ghanshyam Thackeray (25). Manapur is like that. The information has been received that the tempo was seriously injured due to a heavy collision around 5.30 pm today.
The said young man was going from Delanwadi to Manapur on a two-wheeler while the tempo was coming from Manapur to Delanwadi when both the vehicles collided head on. In this collision, Nikhil Thackeray, who was driving a two-wheeler vehicle, was hit on the head, and a large amount of blood is seen at the scene of the incident.
As soon as the citizens of the village got the information about this incident, the citizens rushed to the spot and shifted the youth to the district hospital in Gadchiroli due to severe head injuries.