'

वाघाची झेप तर त्यांची नदीत उडी.... | Batmi Express

0

Chandrapur News,Chandrapur,Warora,Chandrapur Live,Chandrapur Tiger Attack,

तालुका प्रतिनिधी / वरोरा :
शेतातील गोठ्याजवळ वाघ दिसल्याने शेतकऱ्याने आरडा ओरडा केला त्या आवाजाने ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली वाघ झुडपात असल्याने तो दिसला नाही. त्यामुळे काही ग्रामस्थ वाघाच्या जवळून जात होते. ग्रामस्थांच्या दिशेने वाघाने झेप घेतली. समय सुचकता दाखवीत दोन युवकांनी नदीपात्रात उडी घेतल्याने ते बाल बाल बचावल्याचे मानले जात आहे. सदर घटना 17 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास वरोरा तालुक्यातील वडगाव गावाच्या शेत शिवारात घडली.
वरोरा तालुक्यातील माठेळी गावानजीक वडगाव गाव आहे. गावाच्या शेतशिवारात हरिदास तुराणकर यांच्या शेतातील गोठ्याजवळ वाघ दिसल्याने हरिदास तुराणकर यांनी आरडाओरडा करणे सुरू केले.

त्यामुळे ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वाघ झुडपात बसून असल्याने ग्रामस्थांना तो दिसला नाही. वाघाला ग्रामस्थ आल्याची चाहूल लागतात त्याने ग्रामस्थांच्या दिशेने झेप घेतली. त्यावेळी समय सूचकता दाखवीत वरोरा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा वडगावचे उपसरपंच प्रफुल आसुटकर व शैलेश आसुटकर यांनी वेना नदीच्या पात्रात उडी घेतली. त्यात ते दोघे जखमी झाले तर या पळापळीत हरिदास तुरानकर, शंकर मडावी, जगन कुमरे, मुरलीधर तुराणकर हे सुद्धा जखमी झाले. याबाबत वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती देतात घटनास्थळी वन अधिकारी व कर्मचारी पोहोचले. वाघाला पिटाळण्याकरिता फटाके फोडण्यात आले. वाघ हा बामरडा गावाच्या शिवाराकडे गेल्याची माहिती प्रत्यदर्शनीने दिली.
घटनास्थळावर वाघाचे पग मार्क आढळून आले. तो अडीच ते तीन वर्षाचा असण्याची शक्यता आहे. या परिसरात गस्त सुरू करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×