तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

पोटात दुखल्याने १३ वर्षीय मुलीला दवाखान्यात नेले, डॉक्टरच्या माहितीनंतर कुटुंब हादरलं; धक्कादायक बाब आली समोर | Batmi Express

Pune,Pune Crime News,Pune Live,Pune Crime Today,Pune Latest News,Pune Marathi News,Pune News,Pune Today,

Pune,Pune Crime News,Pune Live,Pune Crime Today,Pune Latest News,Pune Marathi News,Pune News,Pune Today,

पुणे:- पुण्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवत अवघ्या १३ वर्षाची मुलीवर १९ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पुण्यातील वानवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एकाच परिसरात राहणाऱ्या आणि ओळखीच्या असणाऱ्या एका तरुणाने १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर १९ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार मागील वर्षीच्या जानेवारी ते जून दरम्यान घडला आहे.

आरोपी आणि पीडित तरुणी हे एकाच परिसरात राहिला असून एकमेकांना ते ओळखतात. ओळख झाल्यानंतर आरोपीने पीडित तरुणीला घरी खेळण्यासाठी बोलवले आणि त्यानंतर "माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपण लग्न करू" असे सांगितले. अवघ्या तेरा वर्षाच्या मुलीचा अज्ञात पणाचा फायदा घेऊन या आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले.

काही दिवसांपूर्वी पिडीत मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला डॉक्टरांकडे नेले असता तपासणीत ती २८ आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. वानवडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.