'
30 seconds remaining
Skip Ad >

Suicide: प्रेम प्रकरणातून तरुणाने गळफास लावून केली आत्महत्या | Batmi Express

0
Nanded,Nanded News,Nanded Live,Nanded Marathi News,suicide,

बल्लारपूर: बल्लारपूर शहरातील टेकडा विभागा अंतर्गत येणारे डॉ. राजेंद्र प्रसाद वार्ड येथील रहिवासी स्वताच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा घटना दि.16/1/2023 रोजी 4:30 सायंकाळ 5:00 वाजता दरम्यान बल्लारपूर शहरात घडली आहे. मृताकचा नाव प्रशिक संजय भासारकर वय 21 वर्ष रा.डॉ. राजेंद्र प्रसाद वार्ड,बल्लारपूर या युवकांनी घरी कोणी नसताना दुपट्ट्याच्या सहाय्याने स्वयंपाक खोलीत घडपास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर प्रशिक नातलग व वार्डातील रहिवास यांनी हल्लेखोरावर कारवाई करण्याची मागणी करत मोठ्या संख्येने पोलीस ठाणे घाटले होते. त्या दोन्ही भावंडावर गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण मांडल्यानंतर बल्लारपूर पोलिसांनी अमर तेलंग व दर्शन तेलंग ह्या दोन्ही भावंडांवर गुन्हा नोंदवली.

प्राप्त माहिती अनुसार अमर तेलंग दर्शन तेलंग व त्यांचे दोन मेहुणे यांनी 31 डिसेंबर रोजी प्रशिक भासारकर याला मक्का मस्जिद जवळ मारहाण केली व त्यानंतर प्रशिकला जंगलातील जवळील नाग मंदिर परसरात नेऊन तिथेही मारहाण करून रक्ताबंबाळ करून पसार झाले. मृतकाचा भाऊ साहिल याला माहीत होतचं तो आपल्या मित्रांच्या मदतीने त्याला रक्तबंबाळ अवस्थेत घरी घेऊन आला व बल्लारपूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली ह्यावेळी आरोपी तेलंगची मेहुणी सुद्धा पोलीस स्टेशन मधे उपस्थित होती व तिने प्रशिकवर आपले प्रेम असून त्यांच्याशी लग्न करायचे असल्याचे सांगितले होते. ह्यानंतर आपल्या विरुद्ध दिलेली पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी अमर व त्याचा भाऊ प्रशिक व त्याचा कुटुंबातील सर्वानाच तक्रार परत घेण्यासाठी पाहून घेण्याची धमकी देऊन दबाव टाकत होते.

आरोपीकडून मिळणाऱ्या सततच्या धमकी मुळे भयभीत होऊन अखेर 16 जनवरी रोजी दुपारी च्या दरम्यान घरी कोणीही नसल्याचे बघून प्रशिक घराच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून महागाच्या दाराने स्वयंपाक खोलीत गेला व दुपट्ट्याचा सहाय्याने गळफास लावून हा आत्महत्या केली.

झालेला प्रकार लक्षात येताच मृतकाचे वडील संजय बापूराव भासारकर 49 यांनी तात्काळ बल्लारपूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. या घटनेनंतर नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी यांनी हल्लेखोरावर कारवाई करण्याची मागणी करत मोठ्या संख्येने पोलीस ठाणे घाटले होते. पोलिसांनी प्रशिकच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या अमर तेलंग व दर्शन तेलंग या दोघांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवि कलम 306,34 अन्वये गुना दाखल केला असून ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ राठोड पुढील तपास करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×