वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli Tiger Attack,Gadchiroli News,Gadchiroli Live News,Tiger Attack
Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli Tiger Attack,Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Tiger Attack

आंबेशिवनी (प्रशांत भैसारे): - आज दिनांक ४ डिसेंबर रोजी मौजा आबेशिवनी येथील महिला आपल्या शेतामध्ये धान खरा करत असतांना कक्ष क्रमांक ४१३ लगतच्या जंगलामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक महिलेवर हल्ला करून जखमी केले. वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव सोनी जितेंद्र उंदिरवाडे वय २४ वर्ष राहणार आंबेशिवनी असे असुन जखमी महिलेला पुढिल उपचार करण्याकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे. सदर महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच वनरक्षक दुर्गे साहेब उपस्थित झाले. वाघाच्या हल्ल्यात आजपर्यंत सदर परिसरातील अनेक जण जखमी आणि ठार झाल्याच्या अनेक घटना घडुन सुद्धा वनविभागाने अजुन पर्यत वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचललेले नाही, आजच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सदर जखमी महिलेला उपचाराकरीता आर्थिक मदत मिळावी हि मागणी जनतेमध्ये जोर धरत आहे आणि त्वरीत वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा आंदोलन उभारू अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.