आरमोरी-कुरखेडा-देलनवाडी टी पॉइंट वर आढळला माओवाद्यांचा बॅनर | Batmi Express

Armori News,Armori,kurkheda,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Armori Live,Gadchiroli Crime,Gadchiroli Batmya,

Armori News,Armori,kurkheda,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Armori Live,Gadchiroli Crime,Gadchiroli Batmya,

वैरागड
: जनमुक्ति छापमार सेना (पि. एल.जी. ए.) दिवस साजरा करण्याचे आवाहन वैरागड येथील वैरागड-आरमोरी-कुरखेडा आणि देलनवाडी रोडकडे जाणाऱ्या टि पॉइंटवर एका चहा-नाष्टा हॉटेल समोर दि. ०४ डिसें. रोजी पुसट अक्षरात लावण्यात आलेल्या बॅनर लाल मध्ये भारत कॉमुनीस्ट पार्टी (माओवादी) यांनी केले आहे.

बॅनर मध्ये लिहिल्या प्रमाणे जनमुक्ती छापमार सेना (पि. एल.जी. ए.) यांची ११ वी स्थापना दिवस आहे. यासाठी ०१ ते ०८ डिसेंबर २०२२ पर्यंत क्रांतिकारी जोश आणि उत्साह मध्ये गावभर साजरा करण्यात यावे. तसेच शोषित, पिडित, गरिबिमुक्त आणि जातीमुक्त समानता आधारावर भारत जनमुक्तीसाठी छापमार सेना मध्ये सहभागी होण्याचे आवाहन हिंदी आणि पुसट अक्षरात लावण्यात आलेल्या लाल बॅनर मध्ये भारत कॉमुनीस्ट पार्टी (माओ वादी) यांनी केले आहे.

आज सकाळी कसरत करणाऱ्या मुलांना आणि नागरिकांना वैरागड येथील आरमोरी-कुरखेडा आणि देलानावडी रोडकडे जाणाऱ्या टी पॉइंटवर एका चहा-नाष्टा हॉटेल समोर लाल बॅनर लावलेले दिसले. याबद्दल आरमोरी पोलिस विभागाला माहिती मिळताच सकाळीच तत्काळ बॅनर हटविण्यात आले. बॅनरवर लिहिण्यात आलेले अक्षर अस्पष्ट आणि पुसट असल्याने बॅनर समजण्यास अडचण जात आहे. लावण्यात आलेल्या बॅनरमुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.