चंद्रपूर :- नागभीड येथील स्वाती घनश्याम नवघडे (२२) हिचा अकस्मात मृत्यू झाला. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. स्वातीने सकाळी भोजन केले. दुपारी तिला अचानक उलट्या सुरू झाल्या. तिच्या वडिलाने लगेच शहरातीलच एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. मात्र, प्रकृतीत कुठलीही सुधारणा न होता रक्तदाब कमी झाला. सायंकाळी तिला ब्रह्मपुरी येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
ब्रह्मपुरीच्या खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. स्वाती ही हुशार मुलगी होती. ती एम. ए. चे शिक्षण घेत होती. एकाएकी घडलेल्या या घटनेची वार्ता शहरात पोहोचताच हळहळ व्यक्त केली जात आहे. 'लोकमत'चे नागभीड तालुका प्रतिनिधी घनश्याम नवघडे यांची स्वाती मुलगी होत. रविवारी सकाळी १० वाजता नागभीड येथील स्मशानभूमीत स्वातीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.