कोरची(तालुका प्रतिनिधी):- आज दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी गटसाधन केंद्र, पंचायत समिती कोरची अंतर्गत जिल्हा परिषद शाळा व श्रीराम विद्यालय कोरची यांचे सहकार्याने कोरची नगरात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त हिरवी झेंडी दाखवून दिव्यांग प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.
मा.टेम्भुरकर सर मुख्याध्यापक जि.प.शाळा कोरची यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून दिव्यांग सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गटसाधन केंद्रातील राकेश मोहूर्ले सर, वाघमारे सर, कुणाल कोचे सर, आडे सर, मोहमकर सर, बावनकुळे मॅडम आणि जिल्हा परिषद व श्रीराम विद्यालय शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थितीत होते. प्रभात फेरीच्या माध्यमाने जनजागृती करण्यात आली तसेच पुष्पगुच्छ देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व शाळेत प्रभात फेरी काढुन दिव्यांग सप्ताहाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच सप्ताहाभर विविध स्पर्धा आयोजित केलेले आहेत.