'
30 seconds remaining
Skip Ad >

ताडोबात अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांच्या चार बछड्यांचा मृत्यू | Batmi Express

0

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Today,Chandrapur Live,Tadoba,

चंद्रपूर :
 ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील शिवनी वनपरिक्षेत्रात वाघाचे चार बछडे मृतावस्थेत आढळून आल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वी १ डिसेंबर रोजी ताडोबा बफर झोनमध्ये एक वाघीण व एक मादी शावक मृतावस्थेत मिळाले होते. त्यानंतर दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे.

ताडोबा प्रकल्पातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वनाधिकारी गस्तीवर असताना वाघिणीचे चार बछडे मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती ताडोबा प्रकल्पाचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना देण्यात आली. माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. यापूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील शिवनी वनपरिक्षेत्रातील वासेरा नियतक्षेत्रात टी-७५ या वाघिणीचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर मोहर्ली वनपरिक्षेत्रातील आगरझरी जंगलातील कक्ष क्रमांक १८९ मध्ये टी-६० या वाघिणीचा मादी शावक मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. चारही मृत शावक सहा ते सात महिन्यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
मोठ्या वाघाने या चार शावकांवर हल्ला केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. ताडोबा व्यवस्थापनाने मृत्यूचे अधिकृत कारण सांगितलेले नाही. हा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, मृत शवकांची उत्तरीय तपासणी केल्यानंतरच अधिकृत कारण समोर येईल, असे सांगितले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×