पारबताबाई विद्यालय येथे फिरत्या विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन | Batmi Express

Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Bus,Korchi,Gadchiroli Batmya,

Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Bus,Korchi,Gadchiroli Batmya,

कोरची: 
येथिल स्थानिक पारबताबाई विद्यालय येथे सी.व्हि.रमन विज्ञान केंद्र  नागपूरच्या व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने फिरत्या विज्ञान प्रदर्शनीचे वाहन दाखल झाले असून या कार्यक्रमाचे उदघाटक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुखमन घाटघूमर तर अध्यक्ष म्हणून बौद्ध महासभा संस्थेचे अध्यक्ष रामदासजी साखरे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक एस एस कराडे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून फिरत्या विज्ञान प्रदर्शनी वाहन टिम नायक अमर वसाके , तंत्रस्नेही नरेंद्र नेमाड,, नरेश शिरपूरकर , शिक्षक हरिश्चंद्र मडावी , सुरज हेमके ,जीवन भैसारे , तुळशीराम कराडे , वसंत गुरनुले , श्यामराव उंदीरवाडे , क्रुष्णामाई खुने , निर्मला मडावी , प्रिया कापगते आदी उपस्थित होते.

       सदर कार्यक्रमाचे उट्घाटन झाल्यानंतर प्रमुख मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीची पाहणी केली. फिरत्या विज्ञान प्रदर्शनीचे मुख्य विषय स्वच्छता व आरोग्य असून यामध्ये पाणी व आरोग्य स्वच्छता कशी राखावी , रोगप्रतिकार शक्ती , स्वास्थविज्ञान स्वच्छता व रोगराई, संसर्गजन्यरोग , आणीबाणी उद्रेक , स्वच्छ भारत निरोगी भारत , लसीकरण , मासिक पाळी व स्वास्थ्य रक्षा , व्यायाम, झोप व विश्रांती , मुखाची स्वास्थ्य रक्षा , अन्न  व स्वयंपाक घर , पेयजल ईत्यादि विषया संबंधित प्रतिक्रुती दाखविण्यात आले होते.

              विद्यार्थ्यांना सम्पूर्ण तारामंडळ यंत्राद्वारे दाखविण्यात आले असून प्रत्यक्ष तिथे असल्याचा भास विद्यार्थ्याना झाला व सायंकाळी टेलेस्कोप या यंत्राच्या साह्याने आकाश दर्शन व तारामंडळ प्रत्यक्ष दाखविण्यात आले.

         कार्यक्रमाचे संचालन शाळेतील शिक्षक वसंत गुरनुले व आभार जिवन भैसारे यांनी मानले.

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील विज्ञान शिक्षक सुरज हेमके , मुन्शीलाल अंबादे , कैलाश अंबादे , पराग खरवडे ,नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.