वडसा : युवतीची गळफास घेऊन आत्महत्या | Batmi Express

Be
0

wadsa,crime news,Gadchiroli,Crime,suicide,Wadsa News,Gadchiroli Suicide,Desaiganj,Gadchiroli Batmya,

वडसा :
येथील आंबेडकर वॉर्डमधील युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 
कल्पना केशव शिवूरकर (२५) असे मृत युवतीचे नाव आहे. युवतीच्या घरातील एका खोलीत धान ठेवले होते. धानाच्या ढिगावर चढून व त्यावर खुर्ची ठेवून गळफास घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मंगळवारी शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. देसाईगंज पोलिस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुजाता भोपळे करीत आहेत.आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->