photo use - represent news
वरोरा:- नागपूर वरून चंद्रपूर ला जाणाऱ्या एका खाजगी बस मध्ये एका तरुणीची छेड काढल्या प्रकरणी नागरिकांनी त्या तरुणाला चांगलाच चोप दिला. सदर घटना गुरुवारला सायंकाळच्या सुमारास स्थानिक रत्नमाला चौकात घडली.
डिसेंबर ११, २०२२
0
सविस्तर वृत्त असे की, नागपूर वरुन चंद्रपूर जाणाऱ्या एका खाजगी बस मध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारी एक तरुण बुट्टीबोरी या ठिकाणाहून बसली. त्याच बसमध्ये विशाल नारायण भगत वय 36 वर्ष, राहणार घुगुस हा सुद्धा बाजूच्या सीटवर बसून प्रवास करीत होता. सदर तरुणी एकटीच प्रवास करीत असल्याचा फायदा घेत विशालने सदर तरुणी छेड काढली.
तरुणीने सदर बाब टेंभुर्डाजवळ बस येताच आपल्या पालकांना भ्रमणध्वनी द्वारे कळविली. पालकांनी लगेच रत्नमाला चौक गाठले आणि ही बाब तेथील नागरिकांना कळताच त्या तरुणाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर बस वरोरा पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली आणि त्याच्या विरुद्ध तक्रार करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी भादवी 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाला नागरिकांनी दिला चोप
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.