'

बिबट्याने केली ९ वर्षीय मुलाची शिकार | Batmi Express

0

Chandrapur News,Chandrapur,Leopard Attack,Korpana,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur Leopard Attack,Chandraapur Live,

कोरपना:- कोरपना तालुक्यात (Korpana taluka) बिबट्याच्या हल्यात (leopard attack) ९ वर्षीय (9 year) एका शाळकरी विद्यार्थ्यांचा बळी गेल्याची दुर्देवी घटना आज सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली. कोरपना तालुक्यातील बेलगाव (belgaon) शेत शिवारात आत्राम  कुटुंबियांचे शेत आहे. आत्राम कुटुंबीय हे सायंकाळी शेतात शेतीचे कामे आटोपीत होते. त्यांच मुलगा नितीन (वय अंदाजे ९ वर्षे) हा रस्त्यावर उभा होता. तेव्हा अचानक बिबट्याने त्यावर हल्ला केला व ओढत झुडपी जंगलात नेले. आरडाओरड होताच थोड्या समोर गाय चारत असलेल्या देवराव धुर्वे यांनीही आरडाओरड केला.


नितीनच्या मदतीला गावकऱ्यांनी जंगलाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत नितीनचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनं गावात शोककळा पसरली आहे. वनकर्मचारी घटनास्थळ वर पोहचले असून गावकऱ्यांनी हिंसक वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×