१६ वर्षीय विद्यार्थिनी डॉक्टरांकडे गेली अन् गर्भवती निघाली, प्रियकराने काढला पळ | Batmi Express

Nagpur,Rape,Lakhandur,Lakhandur News,Gadchiroli,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli Crime,Nagpur Crime,

Nagpur,Rape,Lakhandur,Lakhandur News,Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli Crime,Nagpur Crime,

नागपुर
:- अंगावर सूज आल्यामुळे बारावीच्या विद्यार्थिनीला तिच्या आईने डॉक्टरांकडे नेले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून मुलगी गर्भवती असल्याचे निदान केले. त्यामुळे आईच्या पायाखालची वाळू सरकरली. डॉक्टरांकडून दोनदा तपासणी केल्यानंतर मात्र आईचा पारा चढला आणि मारतच मुलीला पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून मुलीच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. प्रकाश सदार (३५, चार्मोशी, गडचिरोली) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी स्विटी (काल्पनिक नाव) ही बारावीला आहे. तिचे आईवडील आणि भाऊ गवंडीच्या कामाचे ठेके घेतात. तिच्या वडिलांसोबत प्रकाश हा मिस्त्री म्हणून कामावर जात होता. मजुरी घेण्यासाठी तो अनेकदा ठेकेदाराच्या घरी येत होता. त्याची नजर घरात चहा आणून देणाऱ्या स्विटीवर पडली. त्यामुळे प्रकाश कारण नसतानाही घरी येत होता. तिच्या वडिलाला कोणत्याही कामात मदत करीत होता. यादरम्यान त्याने स्विटीशी ओळख वाढवली. तिच्याशी गोड बोलून मैत्री केली. तिचा मोबाईल क्रमांक घेऊन तिच्याशी चॅटिंग सुरू केली

स्विटीला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. अल्पवयीन असलेली स्विटीही त्याच्या जाळ्यात अडकली. तिचे कुटुंबीय कामावर गेल्यानंतर तो काम सोडून घरी यायला लागला. त्याने हळूच स्विटीला प्रेमाची मागणी घातली. तिला प्रेम करीत असल्याचे सांगून शारीरिक संबंधाची मागणी केली. दोघांनीही एकमेकांच्या सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर प्रकाश हा घरी कुणी नसल्याची संधी साधून वारंवार घरी यायला लागला. स्विटीचे त्याने लैंगिक शोषण करणे सुरू केले. सप्टेंबर २०२२ मध्ये तो दुपारी घरी आला. त्याने बळजबरीने स्विटीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिला धमकी देऊन निघून गेला.

असा आला गुन्हा उघडकीस
स्विटीच्या शरीरात हळूहळू बदल व्हायला लागला. तिला उलट्या आणि अंगावर सूज आल्यामुळे आईने दवाखान्यात नेले. तिने शिळे अन्न खाल्ल्याची थाप डॉक्टरांकडे मारली. मात्र, तिच्याकडे बघून डॉक्टरांनी तपासणी करण्याचा निर्णय घेतला. स्विटीची तपासणी केली असता ती चक्क पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी तिच्या आईला माहिती दिली. तसेच पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला. तक्रारीवरून बुटीबोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गर्भवती असल्याची माहिती स्विटीने प्रकाशला दिली. त्यामुळे तिच्या वडिलाकडून मारहाण होण्याची शक्यता लक्षात घेता तो पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.