राज्यात ऑक्टोबर महिन्यात पुन्हा पावसाचा इशारा - पहा कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार | Batmi Express

Weather,Washim,Heavy Rain,Heavy Rain 2022,India News,Weather Updates,Nagpur,Rainfall,rain news,Mumbai,India,

हवामान विभागाच्या दिलेल्या ताज्या माहिती नुसार, ‘नूरू’ या सुपर चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाले असून, त्यामुळे नैऋत्य माॅन्सून देशातून माघार घेण्यास विलंब होत आहे. या सुपर चक्रीवादळामुळे मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडू शकतो - असे पंजाबराव डख यांनी सांगितले .

राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासह कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग - तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, याशिवाय मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

तर ऑक्टोबर महिन्यात दोन मोठे पाऊस होतील, दिवाळीतही पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.

पाऊस कधी येणार ?
 राज्यात परतीच्या माॅन्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. वायव्य राजस्थान, गुजरातमधील कच्छमधून माॅन्सून परतला आहे. 
5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातूनही माॅन्सून माघारी फिरणार आहे. 8 ऑक्टोबरला मुंबईतून माॅन्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
तर राज्यात 28 ऑक्टोबरपासून थंडीला सुरुवात होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे 
5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान - राज्यातून परतीचा पाऊस चालू होणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.