कुरखेडा:- बेलगाम झालेल्या रेती तस्करी ने मध्या रात्री गेवर्धा येथे एका व्यक्तीस वाहनाने धडक दिल्याने जीव गमवावा लागला आहे.मृताकाची ओळख अरत्तोडी येथील भिवा नावलू कुमरे, वय ४५ वर्ष असल्याचे कळते. कुरखेडा उपजिल्हा रुग्णालय येथे डिलिवरी करिता भरती असलेल्या भाची ला पाहण्या करिता कुरखेडा येथे आला होता. रात्री उशिरा गावाकडे परत जात असताना झालेल्या दुर्घटनेत जागेवरच प्राणगत झाला. आज सकाळी गेवर्धा-अरत्तोंडी मार्गावर मृत स्थितीत आढळला.
ऑक्टोबर ०१, २०२२
0
कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटना पंचनामा करून प्रेत ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी करिता कुरखेडा येथे पाठविलं आहे. शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याचे येथील ठाणेदार अभय आष्टीकर यांनी सांगितले. घटनेच्या बाबत सध्या कोणत्याही निकषावर बोलता येणार नाही असे प्रतिनिधीशी बोलतांना प्रतिक्रिया दिली.
मृतका मागे आई , वडील , पत्नी व दोन मुलांचा परिवार आहे. काही पारिवारिक वाद असल्याने मागील 6 वर्षा पासून बबिता भिवेष कुमरे वय ४० वर्ष ही माहेरी राहते. मोठी मुलगी नाशिका भीवेश कुमारे वय १९ वर्ष बी ए २ वर्ष मध्ये शिक्षण घेत आहे तसेच मुलगा यश भिवेश कूमरे वय १२ वर्ष ६ व्या वर्गात आहे.
घटनेच्या वेळी मृतकाची आई धानाबाई नवलू कूमरे ७० वर्ष ह्या उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे होती व वडील नवलु कूमरे वय ७५ वर्ष हे घरी होते. सकाळी घटनेची माहिती मिळाल्या नंतर ते गेवर्धा येथे घटना स्थळी पोहोचले.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.