'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूर: ब्रम्हपुरी सेक्स रॅकेट प्रकरण! मुख्यसूत्रधार नागपूरच्या सिमरणला अखेर पोलिसांनी घेतले ताब्यात ? | Batmi Express

0

Bramhapuri Crime,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Crime,Chandrapur Today,Chandrapur Crime,Bramhapuri News,

ब्रम्हपुरी : - कोलकाता येथील अल्पवयीन मुलीला नागपूर सोबत चंद्रपूर,ब्रम्हपुरी व इतरत्र पाठवून देहविक्री करून घेणारी नागपूर येथील मुख्य सूत्रधार सिमरनला  स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी नागपूरवरून ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करता ब्रम्हपुरी पोलिसांचे ताब्यात दिले असल्याने सदर प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

ब्रम्हपुरी शहरात  बाहेरुन मुली आणून त्यांच्या कडून देह व्यापार केलं जात असल्याचा एक धक्कादायक प्रकार काही दिवसापूर्वी पोलिसांनी उघडकीस आणला. कलकत्ता येथून अपहरण झालेली एक अल्पवयीन मुलगी ही ब्रम्हपुरीला असून विदर्भ इस्टेट कॉलनीत किरायचे घर घेऊन राहणारे लोणारे दाम्पत्य तिच्या कडून देहविक्री करत असल्याचे  प्राप्त सूचनेवरून  दिनाक 17 ला पोलिसांनी सापडा रचून त्या अल्पवयीन मुलीची लोणारे दाम्पत्य चे तावडीतून सुटका करून घेतली होती . नागपूर येथील एका सामाजिक संस्था च्या तक्रारी वर ब्रम्हपुरी पोलिसांनी मानव तस्करी अधीनियम,पोस्को, पिटा ॲक्ट अंतर्गत नोद करून मुख्य आरोपी मंजित रामचंद्र लोणारे वय 40 व चंदा मंजीत लोणारे वय 32 यांना अटक केली.

सदर प्रकरणात ब्रम्हपुरी पोलिसांनी तपास हातात घेऊन मुख्य आरोपींचा पोलिस कोठडी घेऊन मिळालेल्या माहितीचे  आधारावर वडसा येथील अरविंद इंदूरकर वय 47,शिवराम हाके वय 40,राजकुमार उंदिरवाडे वय 42 ,मुकेश बुराडे वय 28 तर लाखांदूर येथील प्रकाश परशुरामकर वय 35,सौरभ बोरकर वय 22 ,गौरव हरिणखेडे वय 28 या लोकांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणात अटक केली .सदर प्रकरणात सर्व आरोपीवर पास्को,पिटा या कलमासह 376,376(3) या कलमाची वाढ केली आहे.सध्या लोणारे दांपत्यास इतर सात आरोपी हे न्यायालयीन कोठडीत आहे.

        स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी सदर प्रकरणात पूढे मोठी कार्यवाही करत  मुख्य सूत्रधार असलेल्या नागपूरच्या सिमरणला ताब्यात घेऊन  पुढील तपासा करिता आज दिनाक 29 ला ब्रम्हपुरी पोलिसांचे ताब्यात दिले आहे.सोबतच सदर प्रकरणात सिमरन सोबत चंद्रपूरच्या आणखी एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती असून सदर प्रकरणात या महिलेची भूमिका काय हे पोलिस तपासात असून या प्रकरणात चंद्रपूर वरून सुद्धा काही लोकांना अटक होणार असल्याची सूत्रांकडून माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×