गडचिरोली: गांधींचे विचार आणि त्यांचा आदर्श भारत, साऱ्यांना प्रेरणा देत राहील.. | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

कोरची
:- ०२ ऑक्टोंबर २०२२ रविवार ला विज़डम संगणक प्रशिक्षण संस्थेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५३ वी जयंती व माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांची ११८ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या जगाला शांतता आणि अहिंसेचा धडा शिकवण्यात महात्मा गांधींचे योगदान समांतर आहे. सर्व संघर्ष अहिंसेने सोडवावेत ही त्यांची शिकवण आहे. तसेच या जगातील प्रत्येक लहान-मोठ्या समस्या शांततेने आणि अहिंसेने सोडवल्या पाहिजेत जेणेकरून लोकांना राहण्यासाठी चांगले वातावरण निर्माण करता येईल, असे त्यांचे म्हणणे होते. 

तसेच लाल बहादुर शास्त्री यांनी स्वातंत्र्यलढ्यात आणि माजी पंतप्रधान म्हणून देशासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. साधेपणाचे मूर्तींमत उदाहरण असलेल्या शास्त्रीजींनी स्वभावातील मृदूता पण तितकीच खंबीरता, स्पष्टवक्तेपणा आणि समन्वयवादी भूमिकेद्वारे अनेक विधायक कार्यांना चालना दिली. 'जय जवान, जय किसान' या घोषमंत्रातून देशवासियांना प्रेरित केले.

विज़डम संगणक प्रशिक्षण संस्थेचे संचालक हुमणे सर यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहताना म्हटले आहे की, गांधींचे विचार आणि त्यांचा आदर्श भारत, साऱ्यांना प्रेरणा देत राहील तसेच गांधीजींच्या तत्वांचे आणि त्यांनी दिलेल्या शांततेच्या संदेशाचे अनुकरण करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे.


यावेळी मयुरीताई कराडे, पूजाताई लोणारे, सारंग सहारे, स्वाती गायकवाड, करण दर्रो, वैभव कुंभरे, प्रियंका हारमे, मोरध्वज मडावी, कुलसुम पठाण, सिंचन रायपूरे तसेच संस्थेचे इतर प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.