चंद्रपूर: कर्मवीर विद्यालय नागभीड येथे शारदोत्सवानिमित्य विविध कार्यक्रम संपन्न | Batmi Express

Nagbhid,Nagbhid News,Chandrapur,Chandrapur News,
Nagbhid,Nagbhid News,Chandrapur,Chandrapur News,

नागभिड
: कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभीड येथे शारदा उत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे तथा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये स्काऊट मास्टर प्रा, किशोर नरुले  गाईड मास्टर प्रा, रजनी चिलबुले यांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट युनिट आणि राजमाता जिजाऊ गाईड युनिट यांच्यावतीने बाल आनंद मेळावा म्हणजेच खरी कमाई या उपक्रमाचे  दिनांक 01/10/2022
रोज शनिवारला यशस्वी आयोजन करण्यात आले यामध्ये स्काऊट आणि गाईड च्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पदार्थाचे 50 पेक्षा अधिक  स्टॉल लावत  या कार्यक्रमामध्ये रंगत आणली.कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, देविदास  चिलबुले  ,पर्यवेक्षक  युवराज ईडपाचे ज्येष्ठ शिक्षक  जगदीश मुनघाटे  प्रभुजी वाघधरे   दिनानाथ लोखंडे  यांच्या हस्ते पार पडले .
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन गोंडवन विकास शिक्षण संस्था नागभीड चे संचालक श्री.प्रतीकजी जनवार  त्यांच्या अर्धांगिनी प्रा,सौ.अवंतिका जनवार  यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

उद्घाटन सत्रामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य देविदास चिलबुले यांनी कौशल्य विकास कार्यक्रमातुन स्वत:चा व समाजाचा विकास कसा करायचा,पैशाचा हिशोब कसा ठेवायचा,विद्यार्थ्यांनी भावी जीवनात व्यवसाय कशाप्रकारे करायचा यांची सांगड घालत व्यवसायाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले . तर याच दिवशी दुसरीकडे  प्रा ,वर्ग ,प्रमोद दिघोरे ,महेश  पुटकमवार,  प्रतिभा कायरकर   यांच्या नेतृत्वामध्ये वर्ग 5 ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वयं शासन हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या वर्गातून 60 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्वतः विद्यार्थीच त्यादिवशी मुख्याध्यापक, शिक्षक ,शिपाई या सर्व भूमिका पार पाडल्या, विद्यार्थी वर्गामधून मुख्याध्यापक म्हणुन अर्थ दुपारे ,दुर्गेश भोले यांनी तर सुरज जुगनाके यांनी पर्यवेक्षक म्हणुन उत्कृष्ठपणे काम पाहिले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा, स्वप्निल नवघडे  यांनी केले तर सर्व विद्यार्थ्यांचे आभार व अभिनंदन स्काऊट मास्टर प्रा, किशोर नरले गाईड मास्टर रजनी चिलबुले यांनी मानले.
 या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा,वर्ग राजेश धात्रक ,अमोल रेवस्कर प्रदिप  खोब्रागडे , श्वैता जनवार , ,कुंदा गिरडे व इतर सर्व शिक्षक,शिक्षिका तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.