तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

सावली: वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी | Batmi Express

Sawali,Sawali News,Chandrapur Tiger Attack,Tiger Attack,

Sawali,Tiger Attack,Sawali News,Chandrapur Tiger Attack,

सावली : 
तालुक्यातील शेत जमीन परिसरालागुन आपली स्वताची जनावरे राखन करण्याकरीता गेले असताना शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून, खुशाल कवडू शेट्टे वय ५० वर्ष असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. तो उपरी येथील रहिवाशी असुन उपवनक्षेत्र व्याहाड खुर्द अंतर्गत परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल असल्याने या परिसरातील हजारो हेक्टर शेत जमीनी जंगल परिसरात असल्याने सोबतच या भागात मोठ्या प्रमाणात वाघाचा धामाकुळ असून वाघाची नेहमीची दहशत निर्माण होत आहे. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेच्या दिवशी शेतकरी खुशाल शेट्टे आपली जनावरे गाई,म्हशी चराईसाठी जंगल परिसरातील कक्ष क्र.१९८ लगत चराई करीत असताना या भागात दब्बा धरून बसलेल्या वाघाने म्हशी वर हल्ला केला.

म्हशीने इतरत्र धाव घेतली परिणामी गाई म्हशी राखणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने झडप घेतली. जखमी शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने वाघाने पळ काढला व लगतच सदर परिसरात काही महिला पुरुष सरपनाकरिता गेले असता जखमी शेतकऱ्याची ओरड पाहून त्या ठिकाणी धाव घेतली.आणि लगेचच जखमी शेतकऱ्याला गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भर्ती करण्यात आले आहे. सदर जखमी शेतकऱ्याला शरीरावरती अनेक जखमा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या भागात वाघाची मोठी दहशत निर्माण झाली असून भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या तर धान पिकाचा हंगाम हाती येत असताना सर्वत्र शेतकरी आपल्या शेतावर असतात त्यामुळे आपला जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ शेतकऱ्यांवर निर्माण झाली आहे या भागातील वन्यजीवांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.