अहेरी: येथील नाल्यानजीकच्या जंगलात बामणीजवळच्या भगवानपूर येथील एका इसमाने सासुरवाडी असलेल्या नागेपल्ली परिसरात येऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव वैभव रवींद्र सहारे असे आहे.
ऑक्टोबर ३१, २०२२
0
वैभव सहारे हा त्याची सासुरवाडी असलेल्या नागेपल्ली येथे पत्नीसोबत आला होता. घरी दारू पिऊन आल्याने पत्नीने त्यांना गावी जाण्यास सांगितले; परंतु तो गावी परतला नाही. दरम्यान त्याने रात्रीच झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. सदर घटनेची नोंद अहेरी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत. वैभवच्या आत्महत्येचे नेमके कारण वृत्त लिहिस्तोवर कळले नाही. गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.