आठवीतील मुलगी पाच महिन्यांची गर्भवती; नागपुरातील धक्कादायक प्रकार | Batmi Express

Be
0
Nagpur LIve,nagpur news,Nagpur,crime Nagpur,Nagpur Marathi News,Nagpur Crime,Rape,

नागपुर:- आठवीत शिकणाऱ्या मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे आईने डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासून मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे आईच्या पायाखालची जमीन सरकली. तिने डॉक्टरांना पुन्हा तपासण्याची विनंती केली. डॉक्टरांनी तपासणी करून मुलगी गर्भवती असल्याचे निदान केले. आईने मुलीची आस्थेने विचारपूस केल्यानंतर घराशेजारी राहणाऱ्या युवकाशी असलेले प्रेमसंबंध उघडकीस आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १४ वर्षीय मुलगी रिया (काल्पनिक नाव) ही आठवीची विद्यार्थिनी आहे. ती सलग दोन दिवसांपासून पोटदुखीची तक्रार करीत होती.

त्यामुळे तिच्या आईने शेतमजुरीची कामे सोडून तिला डॉक्टरांकडे नेले. तिला विचारणा केली असता तिने शिळा भात खाल्ल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी तपासणी करून मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. तिच्या आईला धक्का बसला. तिने घरी गेल्यानंतर मुलीची विचारपूस केली. ती कुणाचेही नाव घेण्यास तयार नव्हती. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला दरडावले. तिने शेजारी राहणारा मुलगा अक्षय संजय मडावी (२१) याचे नाव सांगितले.
गेल्या मे महिन्यात अक्षयने तिला प्रेमाची मागणी घातली होती. ती प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर तिच्याशी चोरून भेटी घेऊ लागला. तिच्या घरी कुणी नसताना तो तिच्या घरी जात होता. अक्षयने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघेही वारंवार संबंध ठेवत होते. यादरम्यान ती गर्भवती झाली. मुलीच्या लक्षात बाब आली परंतु, काय करावे आणि कुणाला सांगावे याची भीती होती. त्यामुळे तिने कुणालाही सांगितले नाही. पाच महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून बुटीबोरी पोलिसांनी अक्षय मडावी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->