आरमोरी: जेरबंद करण्यात आलेला वाघ CT-1 हो कशावरून? आरमोरी नागरिकांना पडला प्रश्न? | Batmi Express

Armori,Gadchiroli News,Chandrapur News,wadsa,Desaiganj News,Chandrapur,Gadchiroli,Bhandara,Wadsa News,Desaiganj,Bhandara News,Armori News,

wadsa,Wadsa News,Desaiganj,Desaiganj News,Gadchiroli,Gadchiroli News,Chandrapur,Chandrapur News,Bhandara,Bhandara News,Armori,Armori News,

आरमोरी: देसाईगंज तालुक्यातील एकलपुर जंगल परिसरात सिटी 1 नावाचा वाघ जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले मात्र आरमोरी तालुक्यातील शेतशिवारात वाघाच्या पाऊलखुणा दिसल्याने नागरिकात दहशत पसरली असून जेरबंद करण्यात आलेला वाघ हाच 13 जणांचा बळी घेणारा कशावरून ? असा प्रश्न आरमोरी तालुक्यातील नागिरकांना पडला आहे.

काल 13 ऑक्टोबर रोजी देसाईगंज तालुक्यातील एकलपुर जंगल परिसरात सिटी 1 वाघाला जेरबंद करण्यात आले. या वाघाने 13 नागरिकांचा बळी घेतला असे बोलल्या जात आहे मात्र काल 13 ऑक्टोबर रोजी आरमोरी तालुक्यातील पालोरा शेतशिवारात वाघ फिरत असल्याचे दिसून आले. पालोरा येथील शेतकऱ्यांनी आज सकाळी आरमोरी जोगीसाखरा रोड वरुन एका शेतकऱ्याच्या शेतात जाणाऱ्या पांदन रस्त्यावर जीवंत पाऊलखुणा आढळुन आल्याने या परीसरात अजूनही वाघ वावरत आहे हे स्पष्ट होत आहे व सालमारा येथील बळीराम कोलते व रामाळा येथील आनंदराव दुधबळे यांचा बळी घेणारा हा सिटि 1 नसुन तो अन्य दूसरा वाघ आहे असे परिसरातील नागरीकाकांचे म्हणणे आहे. जीवंत पाऊलखुणा आढळुन आल्याने नागरिकांमध्ये भीती कायम आहे तरी वनविभागाने एकदम मोकळे न सोडता वैरागड- आरमोरी या परीसरात अजूनही वाघ असून पुन्हा काही विपरीत घटणा घडण्यापुर्वी पाळत ठेवून त्यावर उपाय करावा अशी मागणी नागरिक करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.