'
30 seconds remaining
Skip Ad >

ॲड. विठ्ठलराव बनपूरकर महाविद्यालयात वाणिज्य व मानव विज्ञान अभ्यास मंडळाची कार्यकारणी गठीत | Batmi Express

0

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Kurkheda News,Gadchiroli Batmya,kurkheda,

मालेवाडा वार्ताहर
:- ऍड विठ्ठलराव बनकर मेमोरियल कला व वाणिज्य महाविद्यालय मालेवाडा येथे वाणिज्य व  कला विभागाच्या वतीने वाणिज्य अभ्यास मंडळ व मानव विज्ञान अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी माननीय सहयोगी प्राध्यापक डॉ.भास्कर लेनगुरे, नेवजाबाई हितकरणी महाविद्यालय ब्रह्मपुरी यांच्या हस्ते वाणिज्य विभाग अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले, त्यांनी अभ्यास मंडळाच्या कार्यकारिणीची नावे घोषित केली, अभ्यास मंडळाविषयी कार्य कोणते यावर प्रकाश टाकला, त्याचप्रमाणे मानव विज्ञान अभ्यास मंडळाचे उद्घाटक प्रोफेसर डॉ. धनराज खानोरकर सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानी सुद्धा मानव विज्ञान अभ्यास मंडळाची कार्यकारणी गठीत झालेल्या सदस्यांची नावे घोषित केले व मानव विज्ञान अभ्यास मंडळाचे महत्त्व पटवून दिले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉ. एच. एम. कांबळी सर होते त्यांनी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी सकारात्मक विकास महत्त्वाचा त्याचप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरण याविषयी प्रकाश टाकला.

 विद्यार्थ्यांच्या अंगी सुप्त गुणाच्या कला कौशल्याला कसं वाव मिळता येईल यासंबंधी चे उपक्रम राबवता येईल असेही ते म्हणाले,  प्राध्यापक  दिलीप नंदेश्वर यांनी प्रास्ताविकेच्या माध्यमातून गठीत केलेल्या कार्यकारणी विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक प्रमोद कुमरे यांनी केले तर आभार वाणिज्य विभागाचे प्राध्यापक हिवराज राऊत यांनी मांडले, सदर कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता डॉ. पल्लवी काळे, डॉक्टर ठाकरे ,प्रा. हेमा कराळे, प्रा. रामटेके प्रा. लोहंबरे प्रा. कु. हेमलता शहरे प्रा. आष्टीकर तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×