गडचिरोली: मालवाहु ट्रकच्या धडकेत महिला जागीच ठार...संतप्त नागरिकांनी 8 ट्रक पेटविले | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Accident News,Gadchiroli live,Gadchiroli Batmya,Gadchiroli Live News,Gadchiroli News IN Marathi,

Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Accident News,Gadchiroli live,Gadchiroli Batmya,Gadchiroli  Live News,Gadchiroli News IN Marathi,

गडचिरोली
: सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकांमुळे सातत्याने होणाऱ्या अपघातांची मालिका थांबण्याची चिन्हे अजून तरी दिसत नाहीये आष्टी आलापल्ली मार्गावर आज सायंकाळच्या सुमारास सुरजागड येथून लोह दगड घेऊन जाणारा ट्रकची दुचाकीस्वाराला जबर धडक दिला असून सदर अपघातात दुचाकी वरील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतक महीला सुभाष जयदार यांची पत्नी बिजोली हया आहेत अशी माहिती मिळालेली आहे.

ट्रक चालक घटनास्तळावरून पसार झाल्याचे बोलल्या जात आहे तसेच घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच संतप्त नागरिक घटनास्थळ गाठून सुरजागड येथून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकांना सदर अपघाताचा कारणीभूत ठरवीत संतप्त नागरिकांनी 8 ट्रकांना आगीच्या हवाली केले आहे तसेच आणखी किती नागरिकांचा बळी गेल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागरूक होणार असा सवाल परिसरातील पीडित नागरिक करीत आहे. घटनास्थळी पोलीस विभाग दाखल झाला असून घटनास्तळी कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.