गडचिरोली: वाघाने हल्ला करून शेतकरी महिलेस गंभीर जखमी | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Tiger Attack,Tiger Attack,Gadchiroli Batmya,Chamorshi,Chamorshi News,
Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Tiger Attack,Tiger Attack,Gadchiroli Batmya,Chamorshi,Chamorshi News,

गडचिरोली: जिल्ह्यात वाघाचे मानवावरील हल्ल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. शेतात गवत कापत असतांना वाघाने हल्ला करून शेतकरी महिलेस गंभीर जखमी केल्याची घटना आज 27 सप्टेंबर रोजी दुपारी 02.30 वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील गिलगाव शेतशिवारत घडली. सुमनबाई डोकाजी भोयर (60) मु.पोस्ट गीलगाव ता. चामोर्शी जि. गडचिरोली असे जखमी महिलेचे नाव आहे. सुमनबाई डोकाजी भोयर ह्या नेहमीप्रमाणे शेतात गेल्या होत्या. 

आज शेतात गवत कापत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला यात त्या गंभीर जखमी झाल्या. तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचाराकरिता दादाराव चव्हाण यांच्या वाहनाने हलविण्यात आले असून उपचार सुरु आहे. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.