
ब्रम्हपुरी :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव येथील धृपदा श्रावण मोहुर्ले वय 65 वर्ष ही महिला शेतामध्ये शेतीचे कामे करण्याकरीता गेली होती . तिथे ती शेतीचे काम करत असताना अचानक त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने धृपदा मोहुर्ले यांच्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना आज दुपारी 1.00 वाजता उघडकीस आली. त्यामुळे आवळगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी वन विभागाने या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.