सप्टेंबर २७, २०२२
0
ब्रम्हपुरी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये ब्रम्हपुरी येथील मंजित लोणारे व चंदा लोणारे वडसा येथील अरविंद इंदुरकर वय 47, रुपेश बुराडे वय 28, राजकुमार उंदिरवाडे वय 42 शिवराम हाके वय 40 तर लाखांदूरचे नामे प्रकाश परशुरामकर वय 35, सौरभ बोरकर वय 22. गौरव हरिनखेडे वय 21 या आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापूर्वीच एका दाम्पत्याला ब्रह्मपुरीतून अटक करण्यात आला होती. ब्रह्मपुरीत बाहेरून मुली आणून देहविक्रीचा व्यापार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार एका सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून पोलिसांनी उघड केला आहे.
कोलकाता येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून ब्रह्मपुरीतील विदर्भ इस्टेट कॉलनीत आणले होते. त्या कॉलनीत भाड्याचे घर घेऊन राहणाऱ्या लोणारे दाम्पत्याकडून हा घृणास्पद व्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर १७ सप्टेंबरला पोलिसांनी सापळा रचून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. या प्रकरणी मंजित लोणारे व चंदा लोणारे या दाम्पत्यावर मानव तस्करी अधिनियम, पोक्सो, पिटा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती.
माहितीनुसार, पोलीस तपासादरम्यान पीडित अल्पवयीन मुलगी वडसा व लाखांदूर येथे गेल्याची माहिती मिळाल्याने ब्रह्मपुरी पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवून शनिवारी या प्रकरणात पुन्हा सात लोकांवर मानव तस्करी अधिनियम, पोक्सो, पिटा ३७६, ३७६ (३) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींची न्यायालीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.