ब्रम्हपुरी : आज ब्रम्हपुरी वडसा मार्गावर सकाळच्या सुमारास वडसा येथील कोर्टात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या इसमाचा सुरबोडीजवळ झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला.पंकज दशसहस्त्र वय 40 राह.पटेलनगर ब्रम्हपुरी असे मृतकाचे नाव आहे. ही घटना ब्रम्हपुरी-वडसा मार्गावरील सुरबोडी गावानजीक सोमवारी घडली. पंकज दशसहस्त्र (४०) रा. पटेल नगर ब्रह्मपुरी असे अपघातातील मृताचे नाव आहे. ते गडचिरोली जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते.
प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मपुरी शहरातील रहिवासी असलेले पंकज दशसहस्त्र हे वडसा येथील न्यायालयात नोकरीला असल्याने सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी येथून वडसा येथे जाण्यासाठी दुचाकीने निघाले. ब्रह्मपुरी वडसा रस्त्यावरील सुरबोडी गावानजीक वडसाच्या दिशेने जात असलेल्या ट्रकचा धक्का दुचाकीला लागला. यामध्ये दुचाकीस्वार ट्रकच्या मागील बाजुच्या चाकात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेचा पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.