गडचिरोली: ब्रम्हपुरी सेक्स रॅकेट प्रकरण! देसाईगंज मधील चार जणांना सेक्स रॅकेट प्रकरणात अटक | Batmi Express

Bramhapuri Crime,wadsa,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Crime,Chandrapur Today,Chandrapur Crime,Bramhapuri News,

Bramhapuri Crime,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Crime,Chandrapur Today,Chandrapur Crime,Bramhapuri News,

वडसा (देसाईगंज): चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे गाजत असलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणात वडसा येथील चार आरोपींचाही सहभाग असल्याचे समोर आल्याने वडसा शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कोलकाता येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून ब्रम्हपुरीतील विदर्भ इस्टेट कॉलनीत आणले होते.अल्पवयीन मुलींना आणून त्यांच्याकडून देहव्यापार केला जात असल्याचा प्रकार ब्रम्हपुरी येथे उघडकीस आला आहे. तेथील विदर्भ इस्टेट कॉलनीतील एका भाड्याच्या घरात तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार लोणारे दाम्पत्याकडून सुरू होता.

याप्रकरणी मनजित आणि चंदा लोणारे यांना अटक केल्यानंतर वडसा येथील अरविंद इंदूरकर, शिवराम हाके, राजकुमार उंदीरवाडे, मुकेश बुरांडे यांचीही नावे समोर आली असल्याचे ब्रम्हपुरी पोलिसांनी सांगितले. अटकेतील आरोपी पीसीआरमध्ये असून या प्रकरणात आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.