वडसा: वडसा (देसाईगंज) तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गांधीनगर ( सावंगी) या ठिकाणी मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वीज पडून चार शेळ्या ठार तर शेळ्यांना चारत असताना महिला व पुरुष किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. अंजीरा रमेश कुथे ( वय ४५ वर्ष) व सोमा वकटू बेंद्रे ।(वय ६५ वर्ष) हे घरच्या मालकीच्या शेळ्या चारण्यासाठी नेले होते.
दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक आकाश ढगमय झाल आणि पावसाला सुरुवात झाली. शेळ्यांच्या कळपावर वीज कोसळली. यात चार शेळ्या जागीच ठार झाल्या. शेळ्यां चरत होत्या आणि राखणदार हे थोड्या दूर अंतरावर असल्याने त्याना विजेचा सौम्य झटका बसला. त्याना वेळीच प्राथमिक आरोग्य केंद्र सावंगी या ठिकाणी नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देसाईगंज या ठिकाणी हलविण्यात आले. मृत शेळ्यांचा पंचनामा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटना स्थळी येऊन केला.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.