चंद्रपूर: रविवारी सुटी असल्यामुळे दाताळा येथे इरई नदीच्या पात्रात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाला. गौरव विलास वांढरे (१६) रा.दाताळा, रोहन देवेंद्र बोपाटे (१६) रा.जुनी वस्ती दाताळा असे मृत मित्रांची नावे आहेत. ही घटना दुपारी उघडकीस आली. जिल्हा क्रीडांगण जवळीक लोकमान्य टिळक विद्यालयात दहाव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या या दोन मित्रांनी घरच्यांना न सांगता नदीत पोहायला जाण्याचा बेत आखला. त्यानुसार दुपारी ते नदीवर गेले.
नदी काठावर कपडे काढून आंघोळीसाठी पाण्यात उतरले. नदीला भरपूर पाणी असल्याने तिथेच बुडून त्यांचा मृत्यू झाला. यातील एकाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. दोघेही दाताळा येथील राहणारे होते.
दरम्यान, नागरिकांनी रामनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच रेस्क्यू टीमसह घटनास्थळ गाठले. यावेळी गावकऱ्यांचा मदतीने शोध सुरू केला. काही अंतरावर रोहनचा मृतदेह आढळून आला. घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक योगेश खरसान करत आहेत
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.