'
30 seconds remaining
Skip Ad >

गडचिरोली: कोरची येथील धम्मभूमी वर बोधीवृक्षाचे वृक्षारोपण | Batmi Express

0
Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

कोरची ( रजिस्टर कोरची तालुका प्रतिनिधी ):- दि 26/9/2022 येथील धम्मभूमी परिसरात बोधीवृक्षाचे वृक्षारोपण 25 सप्टेंबर ला तालुक्यातील बौद्ध समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आले.  त्यानंतर पारबताबाई विद्यालयात सभा घेण्यात आली. या सभेत प्रामुख्याने चार विषयावर चर्चा करण्यात आली. पहिल्या विषयात, ज्या ग्रामपंचायत मध्ये दलितांची लोकवस्ती आहे, त्या वस्तीत नाल्या, रस्ते, वीज, पाण्याची सोय, सभामंडप, समाज मंदिर ई. कामे करण्यासाठी शासनाकडून दरवर्षी निधी मंजूर होतो. परंतु हा निधी दलितांच्या वस्तीत खर्च न करता इतरत्र खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे या निधीचा दलितांना लाभ मिळत नाही. याविषयी चर्चा करण्यासाठी समिती तयार करण्यात आली. दुसरा विषय सामुहिक विवाह. वेळ आणि पैशाचा विचार करता, सामुहिक विवाह ही काळाची गरज आहे. मी मोठा, हा लहान असा भेद न करता, यावर्षी पासून तालुक्यात सामुहिक विवाह करण्याचे ठरविण्यात आले. तिसऱ्या विषयावर चर्चा झाली ती धर्मांतरावर. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी गरिबीचा फायदा घेऊन तालुक्यातील लोकांना आपल्या कडे वळविले आहे. त्यामुळे ते लोक त्यांच्या रीतीरिवाजांप्रमाणे सर्व सन, विधी, उरकतात. अशांना बौद्ध धम्माप्रमाणे सर्व कार्यक्रम घेण्याच्या सूचना व समज देण्याचे ठरविण्यात आले. चौथा विषय राजकारणाचा. दलित नेत्यांमध्ये एकी नाही, त्याचा विपरीत परिणाम समाजावर होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व गटातील लोक एकत्र बसून निर्णय घेण्याचे ठरले. 

यावेळी तालुका अध्यक्ष नकुल सहारे यांच्या अध्यक्षतेखाली, आनंदराव राहुल कोटगुल, बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आनंद मेश्राम, सचिव शालिकराम कराडे, सुदाराम सहारे कुकडेल, किशोर साखरे कोरची यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. 

यावेळी अंताराम टेंभुर्णे कोसमी-2, सुरेश लांडगे कोटगुल, अनिल जनबंधु ढोलडोंगरी, चंद्रशेखर उमरे नांगपूर, मदन वालदे जामनारा, इंद्रपाल सहारे गहाणेगाटा, रामदास अंबादे बोरी, ईश्वर नंदेश्वर बेलगाव ( घाट) , हिवराज कराडे कोचीनारा, सुभाष नंदेश्वर दवंडी, जयदेव सहारे बेळगाव, शंकर जनबंधु पांढरीगोटा, अनिल नंदेश्वर कुकडेल, गौतम चौधरी भिमपूर, कैलास अंबादे, महेश लाडे सोहले, छगनलाल चौधरी नांदळी, यशवंत लाडे सोहले, यशवंत सहारे कोटरा, रामकिरपाल भाणारकर बोटेकसा, रमेश चौधरी मर्केकसा, मानीक राउत मसेली, रंजित मेश्राम बोदालदंड, इंद्रलाल सहारे गहाणेगाटा, गिरधर जांभुळे कोरची, रमेश सहारे, यादव खोब्रागडे, जीवन भैसारे, चंद्रशेखर अंबादे, जनबंधु सर, टेंभुर्णे सर , चेतन कराडे, भिमपूरच्या अध्यक्षा सविता जांभुळकर आणि बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×