तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

वाघ आला! गडचिरोली जवळ वाघ आला...नागरिकांनो सावधान | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Batmya,Gadchiroli Live News,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,

Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Batmya,Gadchiroli  Live News,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,

गडचिरोली
: शहरापासून केवळ अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या जंगलात वाघाने गाय ठार केली. विशेष म्हणजे या परिसरात गडचिरोली शहरातील नागरिक सकाळी फिरायला जातात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुलखल येथील प्रदीप महाजन यांची गुरवळा येथे गोशाळा आहे. या गोशाळेतील गायी चरण्यासाठी जंगलात सोडले असता गाय परत आली नाही. महाजन हे गुरवळा परिसरात गायीचा शोध घेत होते.

१८ सप्टेंबर रोजी गडचिरोली शहरातील काही नागरिक गुरवळा मार्गावर फिरण्यासाठी गेले असता त्यांना कावळे ओरडण्याचा आवाज आला. त्या ठिकाणी जाऊन बघितले असता वाघाने लाल रंगाची गीर जातीची गाय ठार केली असल्याचे दिसून आले. ही माहिती महाजन यांना देण्यात आली. याबाबत महाजन यांनी सहायक वनसंरक्षक यांच्याकडे तक्रार केली. वनविभागाने मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

मॉर्निंग वॉकला जाताना सावधान:

गडचिरोली शहरातील रामनगर व शाहूनगरातील शेकडो नागरिक गुरवळा मार्गावर सकाळी फिरण्यासाठी जातात. याच परिसरात वाघाने गायीला ठार केले. यापूर्वीही या परिसरात वाघाचे दर्शन नागरिकांना झाले आहे. त्यामुळे सकाळी फिरायला जाताना नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.