देसाईगंज:- वडसा तालुक्यातील रेल्वे स्थानकात कार्यरत रेल्वे कर्मचाऱ्याचा आज 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7. 40 वाजताच्या सुमारास धावत्या रेल्वेखाडी आल्याने शरीर कटून त्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतक रेल्वे कर्मचाऱ्यांचे नाव विजय शंकर ठाकूर (वय ४५) असं आहे.
तो कुणालाही काहींही न सांगता वडसा -वडेगाव रेल्वे मार्गाने फिरायला गेल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान रेल्वेगाडी खाली येऊन इसम कटल्याचे समजतात रेल्वे चालकाने स्थानक व्यवस्थापकांना या घटनेची माहिती दिली.
या घटनेची माहिती देसाईगंज पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करून पुढील चौकशी सुरू केली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.