काल दिनांक 2 सप्टेंबर रोजी संजय श्रीराम कांबळे वय 42 वर्ष याने आपला मुलगा संजय कांबळे वय 5 वर्ष तर मुलगी मिस्ट्री संजय कांबळे वय 3 वर्ष या दोन्ही मुलांची शालीमार ट्रेडर्सच्या मागील वसाहतीत असणाऱ्या आपल्या राहत्या घरी दोन्ही मुलांना जबरदस्तीने विष पाजून हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती त्यानंतर त्यानंतर सदर बालकांचे प्रेत उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले डॉक्टरांनी दोन्ही बालकांना मृतक घोषित केल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी ,पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्वरित तपासाचे चक्र संजयच्या मूळ गावी असलेल्या साखरा या दिशेने वळविले अखेर पोलिसांना संजय याचा मृतदेह साखरा मंगरूळ रोडवर असलेल्या एका शेतामध्ये आढळून आला आर्थिक विवंचनेतून सदर हत्या घडल्याची माहिती पोलिसांनी दिली,मुलांच्या हत्ये नंतर संजय याने आपले जीवन संपविले,पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
मनिष भुसारी, वरोरा