कोरची: 15 ऑगस्टला संपूर्ण देश भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा म्हणजे आजादी का अमृत महोत्सव व 26 ऑगस्टला गडचिरोली जिल्ह्याचा 40 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. परंतु अजूनही कोटगुल परिसराची परिस्थिती हलाखीची असून या परिसरात विज, रस्ते, आरोग्य, नेटवर्क अशा विविध समस्या उद्भवत असून याकडे संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे नेहमी दुर्लक्ष होत असल्यामुळे संपूर्ण कोटगुल परिसरातील नागरिकांनी 1 सप्टेंबरला मुरुमगाव येथे विद्युत कार्यालयाचा घेराव केला व 2 सप्टेंबर पासून मागणी पूर्ण होईपर्यंत मुरुमगाव येथील राष्ट्रीय महमार्गावर बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनामध्ये लहान लहान मुले व स्त्री-पुरुषांचा बहुसंख्य संख्येने सहभाग होता.
कोटगुल परिसरातील नागरिकांना नेहमी विकासापासून डावलले गेले असल्याचे चित्र आज दिसून आले. ढोलडोंगरी येथे 33 केवीचे उपकेंद्र मंजूर झाले असून अजूनही मंजुरी फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. कोटगुल येथे BSNL 4G सेवा उपलब्ध करून देने, कोटगुल येथे 50 खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे बाँधकाम करने, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तातडीने आर्थिक मदत देने, महाराष्ट्र परिवहन मण्डळाची बस सेवा कोटगुल क्षेत्रात पूर्वरतपणे सुरु करने, परिसरातील पक्के रस्ते निकृष्ट दर्जाचे बनविण्यात आले असून सदर कामाची चौकशी करून पुनश्च रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे, खरीप हंगाम वर्ष 2021 - 22 सत्राचे आदिवासी विकास महामंडळाकडून अद्याप प्राप्त न झालेले बोनस शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात तात्काळ जमा करावे, नरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेचा लाभ माहे फेब्रुवारी ते मार्च पर्यंतची मजुरी अद्याप मिळाली नसल्याने सदर मजुरी मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, कोटगुल परिसरातील शिक्षक व अन्य कर्मचारी व अधिकारी यांना मुख्यालय राहण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात यावा जेणेकरून लोकांच्या कामाप्रती गैरसोय होणार नाही. कोटगुल क्षेत्रातील पिटेसुर - अलोंडी - मिसपीरी जाणे करिता मार्गाची गैरसोय होत असल्याने सदर रस्त्याचे तसेच पूल बांधकाम करण्यात यावे व कोटगुल परिसरातील दुग्गाटोला व अरमूरकसा येथे मोठे तलाव आवश्यक असून सदर कामाला मंजुरी देण्यात यावी. अशा विविध मागन्यासह आंदोलन करण्यात आले परंतु याकडे संबंधित विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांना आंदोलन करावे लागत असल्याची माहिती कोटगुल क्षेत्रातील नागरिकांनी दिली.
रस्त्या लगतच असलेल्या जंगलात कोटगुल क्षेत्रातील नागरिकांनी आपले वास्तव्य केले होते. तेथेच आंदोलनकर्त्यांनी जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली होती. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची मागणी केली परंतु लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे प्रतिपादन आंदोलनकर्त्यांनी केले. विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यां तर्फे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी या आंदोलनाला उपविभागीय अधिकारी - दर्शन निकाळजे, तहसीलदार कोरची - सोमनाथ माळी, पोलिस उपअधीक्षक - झरकर कुरखेडा, वरिष्ठ अभियंता म रा वि वि गडचिरोली घाडगे, कार्यकारी अभियंता म रा वि वि गडचिरोली डोंगरवार, उपकार्यकारी अभियंता म रा वि वि गडचिरोली आदि अधिकारी उपस्थित होते. सदर आंदोलन हे सुमारे 8 तास चालल्यामुळे गड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कोट
विद्युतच्या समस्येकरीता अधिवेशनाच्या बजेटमध्ये आपण मागणी करून उपमुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तातडीने पाठपुरावा करू व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वासनिक यांची सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांचे पंचनामे करायचे लगेच आदेश तहसीलदार यांना देण्यात आले असून मार्च 2023 पर्यंत ढोलडोंगरी येथील विद्युत उपकेंद्राचे कार्य पूर्ण होईल तसेच 30 जून 2023 पर्यंत सदर उपकेंद्र हे सुरू करण्यात येईल.
कृष्णा गजबे
आमदार
आरमोरी विधानसभा क्षेत्र