Chandrapur Accident: नदी पुलावर ओव्हरटेक करताना ट्रकला बोलेरोची जबर धडक

Rajura,Rajura News,Accident,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,Chandrapur News,
Rajura,Rajura News,Accident,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,Chandrapur News,

राजुरा
:- बल्लारपूर-राजुरा शहरांना जोडणाऱ्या वर्धा नदी पुलावर एक भीषण अपघात झाला. महिंद्र बोलेरो आणि ट्रकची धडक झाली. या धडकेत पुलाचे कठडे तोडून अधांतरी अडकलं होतं. विशेष म्हणजे या बोलेरो कारमध्ये सहा प्रवासी तसेच अडकून राहिले होते. या सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यामुळे काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय कारमधील प्रवाशांना आलाय.
बल्लारपूर-राजुरा शहरांना जोडणाऱ्या वर्धा नदी पुलावर हा विचित्र अपघात घडला. प्रवाशांनी भरलेल्या बोलेरो वाहनाने ट्रकला ओव्हरटेक केला. ओव्हरटेक करताना ट्रकला बोलेरो कारने धडक दिली.
धडकेनंतर बोलेरो वाहन पुलाचे कठडे तोडून अधांतरी अडकलं होतं. अखेर पोलीस आणि नागरिकांनी तातडीने पोहचत सहा प्रवाशांचे प्राण वाचविले. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय.
या अपघातानंतर या अरुंद पुलावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. बल्लारपूर पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अधांतरी अडकलेले बोलेरो वाहन बाहेर काढलं. दरम्यान तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या पुलावर अरुंद स्थितीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.