चंद्रपूर:- कोरोना काळात मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतुकीवर निर्बंध आणण्यात आले होते. याकाळात मोठ्या प्रमाणात ट्रेन बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. आता परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर देखील ट्रेन सुरु झाल्या नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. हि जनतेची निकड लक्षात घेऊन खासदार बाळू धानोरकर यांनी रेल्वे विभागाशी पाठपुरावा करून ट्रेन क्र. ०८८०८ वडसा - चांदा फोर्ट व ट्रेन क्र. ०८८०५ चांदा फोर्ट - गोंदिया १२ डब्याची मेमू पॅसेंजर स्पेशल ट्रेन सुरु केली. हि ट्रेन प्रवाशांच्या सेवेत १ ऑक्टोबर 2022 पासून पुन्हा एकदा धावणार आहे. त्यामुळे या मार्गावरील जाणाऱ्या लाखो प्रवाशांमध्ये आनंद दिसून येत आहे.
गोंदिया-वडसा स्पेशल पॅसेंजरी ही रेल्वे गाडी 30 सप्टेंबरला गोंदिया रेल्वेस्थानकावरुन सायकांळी 7 वाजता(19.00 पीएम)ला सुटणार तर वडसा येथे रात्रीला 9.30 वा पोचणार आहे. तर वडसा-चांदापोर्ट ही रेल्वेगाडी वडसा रेल्वेस्थानकावरुन सकाळी 7.15 वाजता सुटेल व चांदापोर्टला 9.55 ला पोचेल.तर चांदापोर्ट-गोंदिया ही रेल्वेगाडी 1 आँक्टोंबरपासून चांदापोर्ट रेलवे स्थानकावरुन सकाळी 10.20 वाजता सुटणार असून गोंदियाला सायकांळी 4 वाजता पोचणार आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.