कोरची(कोटरा) ( रजिस्टर कोरची तालुका प्रतिनिधी ): - दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोज रविवारला शेतकरी, शेतमजूर, दुर्बल घटक बेरोजगार, व्यापारी यांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनासंदर्भात धर्मरावबाबा राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा दरम्यान कोरची तालुक्यातील कोटरा येथे धर्मरावबाबा आत्राम, माजी राज्यमंत्री मंत्रालय मुंबई तथा विद्यमान आमदार अहेरी विधानसभा यांच्या उपस्थितीत धर्मरावबाबा राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा पार पडली या दरम्यान ग्रामस्थांनी निवेदनाच्या माध्यमातून अनेक समस्या ठेवल्या यामध्ये कोटरा ते कोकोडी गोंदिया सीमेपर्यंत खडीकरण करून डांबरीकरण करणे, कोटरा ते मुलेटीपदीकसा डांबरीकरण करणे, हितापाडी ते धमदीटोला गोंदिया सीमेपर्यंत खडीकरण व डांबरीकरण करणे, कोटरा ग्रामपंचायत अंतर्गत कोटरा गावाच्या परिसरात १५ गावांचा समावेश असून या ठिकाणी आरोग्य पथकाचे निर्मिती करणे, मौजा कोटरा येथे BSNL नेटवर्क टावर उभारणे, हितापाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची नवीन इमारत बांधणे अशा अनेक विषयासंदर्भात निवेदने देण्यात आली. यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी स्थानिकांचे प्रश्न जाणून घेतले व त्याचे निराकरण करू अशी ग्वाही दिली व केंद्र सरकार शासनाच्या धोरणावर टीका टिपणी केली.
यावेळी रविभाऊ वासेकर, जिल्हाध्यक्ष राकाँपा, गडचिरोली, नानाभाऊ नाकाडे माजी कृषी सभापती जि.प.गडचिरोली, शाहीनभाभी हकीम, महिला जिल्हाअध्यक्ष, लिलाधर भरडकर, रॉ. यु. काँ. जिल्हाअध्यक्ष, अनिल साधवानी, रॉ. यु. काँ. कार्याध्यक्ष, फहीमभाई काझी, जिल्हा उपाध्यक्ष, सियाराम हलामी तालुका अध्यक्ष, अविनाशभाऊ हुमणे, गिरीजाताई कोरेटी, स्वप्नील कराडे, चेतन कराडे, कपिल बागडे, विजय उईके तालुका सरचिटणीस रा.यु. कांग्रेस कोरची, राहुल मलगाम, सरपंच ग्रामपंचायत कोटरा, जीवनलाल नरोटी माजी उपसरपंच ग्रामपंचायत कोटरा, देवचंद दखणे उपसरपंच ग्रामपंचायत कोटरा, अनिल केरामी सरपंच ग्रामपंचायत बोदालदंड, प्रमोद कोवाची पोलीस पाटील शिकारीटोला, कार्तिकराव मडावी पोलीस पाटील हितकसा, अलीसाय काटेंगे माजी पोलीस पाटील कोलूपदीकसा, ध्रुपाल नैताम, संपत नैताम, ईश्वर कल्लो, तुलाराम मडावी, संदीप ताडामी, राजू दुग्गा, लालचंद उईके, देवकुमार नैताम, विजय धुर्वे, वसंत नैताम, जंगलू टेकाम, तुकाराम नैताम, गंगाराम धुर्वे, प्रेमलाल काटेंगे, धनुराम कल्लो, नकुल साहारे, धम्मदीप लाडे, विशाल जांभुळे, तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते..
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.