'
30 seconds remaining
Skip Ad >

गडचिरोली: छत्तीसगड राज्याची जीवनदायी असलेल्या शिवनाथ नदीच्या उगमस्थानी महाआरती | Batmi Express

0

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

  • शिवनाथ नदीच्या उगमस्थानी महाआरती
  • छत्तीसगड राज्याच्या स्तृत्य उपक्रमाला आमदार तथा संसदीय सचिव इंदलसाय मडावी यांची उपस्थिती 

कोरची ( रजिस्टर कोरची तालुका प्रतिनिधी ): झाडाला फळे लागतात पण झाड कधी फळ खात नाही ती फळ इतरांच्या उपयोगी पडत असतात असेच काही कोरची तालुक्यातील गोडरी गावातून उगम झालेल्या शिवनाथ नदीमुळे छत्तीसगड राज्याची जीवनदायी ठरलेली नदी कोरची तालुक्यातील लोकांना उपयोगाची नसली तरी आम्हाला ती जीवनदायी आहे असे उद्गार आमदार तथा संसदीय सचिव इंदल साहेब मडावी यांनी महाआरती कार्यक्रमात काढले.

धान का कटोरा म्हणून प्रख्यात असलेल्या छत्तीसगड राज्याला सिंचनापासून पिण्याच्या पाण्याची सोय करून देणारी छत्तीसगड राज्याची जीवनदायी असलेली शिवनाथ नदीचे उगम स्थान असलेल्या कोरची तालुक्यातील गोडरी येथे छत्तीसगड प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार तथा संसदीय सचिव इंदलसाय मडावी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली .

छत्तीसगड राज्यातील चौकी राजनांदगाव रायपूर भिलाई पासून सर्व गावांना सिंचनाच्या सोयीपासून पिण्याच्या पाण्याची सोय करणारी शिवनाथ नदी मुळे, छत्तीसगड राज्यातील जनतेला जीवनदायी असलेल्या नदी मुळे आपला जीवन सर्व गोष्टींनी परिपक्व आहे अशी धारणा ठेवून छत्तीसगड शासनाने उगमस्थान असलेल्या गोडरी गावात येऊन प्रशासकीय महाआरतीचे 24 सप्टेंबरला आयोजन करण्यात आले होते या महाआरतीचे शासकीय प्रतिनिधी म्हणून आमदार तथा संसदीय सचिव इंदलजी मडावी यांना जबाबदारी  दिली होती यावेळी छत्तीसगड राज्यातील बहुसंख्य नागरिक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष गडचिरोली जिल्हा परिषदचे माजी कृषी सभापती नाना नाकाडे होते गडचिरोलीचे माजी आमदार नामदेवराव उसेंडी हे प्रामुख्याने उपस्थित होते.

न्यु एकता आदिवासी क्रीडा मंडळ देऊळभटटी पाटिलटोला यांच्या सौजन्याने आयोजित एक दिवसीय डे नाईट भव्य प्रो कबड्डी स्पर्धेचे औपचारिक साधून शिवनाथ नदी उगमस्थान दर्शन महाआरती आयोजन करण्यात आले होते.

यावेळी देऊळभटी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सौ गीरजा कोरेटी, कोरची पंचायत समिती सभापती श्रावनजी मातलाम, राजेश नैताम, परमेश्वर लोहंबरे, झुल्फिकार खेतानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सियाराम हलामी, अविनाश हूमने,चेतन कराडे, स्वप्निल कराडे आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जैन यांनी केले तर आभार मनोज अग्रवाल यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ईश्वर कोरेटी, प्रेमलाल उसेंडी, उत्तम कोरेटी, धनपाल टाटपलान,भुवन मुलेटी पंकज बघवा,दयाराम पंधरे,हिरा आडुलवार, अर्जून कोरेटी पन्नालाल फुलारे यांनी विनोद कोरेटी यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम घेतले आहे.

गोडरी गाव हे अतिसंवेदनशील असल्याने गडचिरोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×