'
30 seconds remaining
Skip Ad >

गडचिरोली: जिल्हाधिकारी संजय मिणा यांचेसह दोषींवर गुन्हे दाखल करा : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाइकांची मागणी | Batmi Express

0

Gadchiroli,Gadchiroli News,Etapalli,Gadchiroli Batmya,Gadchiroli live,Gadchiroli  Live News,

गडचिरोली :  
पावसामुळे वाहून येणाऱ्या लाल गाळामुळे धान पिकाची संपूर्ण नुकसान झाल्याने आम्हाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी संजय मिणा आणि अधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी बेजबाबदार उत्तर देवून फटकारल्याने अजय टोप्पो यांनी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा आरोप मृतकाची पत्नी उमीना, मुलगा रोशन, शाऊ जगतपाल आणि वडील दिलराम टोप्पो यांनी आज गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे . 

एटापल्ली तालुक्यातील मौजा मलमपाड़ी येथील उराय आदिवासी शेतकरी अजय दिनराम टोप्पो (३८) यांनी ३१ ऑगस्ट २०२२ रोजीच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली असून त्याच्या शेतात  पावसामुळे वाहून येणाऱ्या लाल गाळामुळे धान पिकाची नुकसान झाल्याने मौजा मंगेर येथे वरिष्ठ अधिकाऱ्यासह जिल्हाधिकारी संजय मिणा यांचेकडे न्याय देण्याची मागणी करूनही न्याय न देता जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी, तुम्हाला वनहक्क दावा मंजूर होऊ शकत नाही, तुम्हाला आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र देवू शकत नाही, तुम्हाला आज ना उद्या ही जमीन सोडून दयावी लागणार आहे. जमीनीचे काहीच कागदपत्रे नसल्याने तुम्हाला नुकसान भरपाई आम्ही देऊ शकत नाही, असे उत्तर दिले. या उत्तराने दुखावलेल्या शेतकरी अजय टोप्पो यांनी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. अशी माहिती नातेवाईकांनी यावेळी दिली.
अजय टोप्पो यांची आत्महत्या हि जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशील कार्यपद्धतीमुळे झालेल्या आहेत. मात्र पोलिस विभागाच्या मदतीने दबाव टाकून सदर आत्महत्या दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. काल हेडरी पोलिसांनी नातेवाईकांना बोलविले आणि सर्वांच्या सहया कोऱ्या कागदावर घेतल्या, त्यावर पोलिसांनी काय लिहिते हेही आम्हाला सांगितले नाही, असे मृतकाचा भाऊ जगतपाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नुकसानग्रस्त एका शेतकल्याने आत्महत्या करुनही जिल्हाधिकारी संजय मिणा  सदर शेतकऱ्याला खोटे ठरवून पोलिसांमार्फत आत्महत्येचे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न चालविला आहे. हे दुर्दैवी बाब असून आदिवासी शेतकरी अजय दिलराम टोप्पो यांना न्याय मिळण्यासाठी निष्पक्षपणे चौकशी व्हावी व जिल्हाधिकारी संजय मिणा आणि इतर दोषी अधिकारी व कर्मचान्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव का अमीत मारकवार, पारंपारिक इलाक्याचे प्रमुख, माजी जि. प. सदस्य सैनू गोटा, अशोक बडा, ॲड. लालसू नोगोटी, सुरजागडच्या माजी सरपंच कल्पना आलाम, मंगेश नरोटे, तुकाराम गेडाम यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×