चंद्रपूर : चिमूर शहरातील आझाद वार्डातील एक विधवा महिलेने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना काल सोमवारच्या मध्यरात्री घडली. कविता आशीष पाटील (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मृत कविता आशीष पाटील हिच्या पतीचे मृत्यु झाल्यानंतर मुलासोबत गुरुदेव वार्ड चिमूर येथे सासुकडे राहायची. मात्र सासु सोबत पटत नसल्याने कविता माहेरी कुरखेडा तालुक्यातील वासी येथे राहायची.
संजय गांधी निराधार योजने अंतर्गत मिळणारे पैसे उचलण्या करीता शनिवारी ती आझाद वार्ड येथे राहणाऱ्या नातलगाकडे आली होती. सोमवारला सासु कर्करोगाने नागपूरला भरती असल्याने तिला बघून वापस आली. रात्री जेवन करून झोपल्या नंतर कविता बाधरूमच्या बहान्याने साडेदहाच्या सुमारास घराबाहेर पडली. आणी शेजारीच असलेल्या मावस सासु संध्या जारूंडे यांच्या विहिरीत उडी घेतली.बाथरुमला गेलेली कविता उशीरा पर्यंत परत आली नाही म्हणुन नातलगांनी सर्वत्र शोध घेतला. विहिरीचे कठडे बाजुला सरकल्याचे दिसल्याने विहिरीत टार्चच्या मदतिने पाहीले असता कविताचे प्रेत तरंगताना दिसले. घटनेची माहीती चिमूर पोलिसांना देण्यात आली.
पोलिस उप निरीक्षक अलिम शेख, पोलिस हवालदार विलास निमगडे, राहुल चांदेकर यांचे सह घटनास्थळावर पोहचुन तरुणांच्या मदतिने प्रेत विहिरीतुन काढूण पंचणामा केला. प्रेत उत्तरीय तपासणी करीता उप जिल्हा रूग्णालय चिमूर येथे पाठवण्यात आले. आत्महत्येचे कारण अजुन स्पष्ट झाले नसुन घटनेचा मर्ग दाखल करण्यात आले असुन पुढील तपास पोलिस हवालदार प्रविण तुराणकर करीत आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.