'
30 seconds remaining
Skip Ad >

ब्रम्हपुरी: वीज पडून एका महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी | Batmi Express

0

Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,Chandrapur,Chandrapur Lightning Strike,Chandrapur Live,Chandrapur News,

ब्रम्हपुरी
: - तालुक्यातील आवळगाव शेतशिवरात विज पडून एका महिलेच्या जागीच मृत्यु झाला तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना आज दिनांक 11 सप्टेंबर 2022 ला दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास घडली आहे. शामल वासुदेव झोडे वय वर्षे 47 असे विज पडून मृत्यु झालेल्या महिलेचे नाव असून ज्योती निलेश पोहनकर वय 26 असे जखमी महिलेचे नाव आहे. सदर दोन्ही महिला ह्या आवळगाव येथील रहिवाशी आहेत.

सविस्तर वृत्त असे आहे की, तालुक्यात मोठ्या प्रमाणात धनापिकाची लागवड केली जात असून धानपिक चांगल्या प्रकारे हाती यावे म्हणून धानपिकाची देखभाल केली जाते त्यातच आवळगाव येथिल नत्थुजी नरुले यानी शेतामध्ये धानपिकाची लागवड केली आहे. त्या धानपिकाच निंदन काढण्यासाठी गावातीलच काही महिला शेतावर गेले असता अचानक दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडटासह पावसाला सुरु झाली. त्यातच नरुले यांच्या शेतात निंदा काढत असलेल्या महिला शामल झोडे यांच्या अंगावर विज पडली त्यामध्ये शामलचा जागीच मृत्यु झाला. तर तिच्या शेजारी असलेली महिला ज्योती पोहनकर हिला विजेचा झटका लागला त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. जखमी ज्योतीला उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे उपचारार्थ नेण्यात आले. तर मृतक शामलला उत्तरीय तासणीसाठी ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले.

या घटनेने आवळगाव परिसरात शोककळा पसरली असून झोडे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.घटनेचा पुढील तपास संबधित पोलिस विभाग करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×