शुभ मंगल सावधान: गणपतीच्या मंडपात प्रेमीयुगुलांचा विवाह | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

चंद्रपूर
:- चंद्रपूर शहरात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच संजय नगरातील एका मंडळाच्या गणपतीसमोर आरतीनंतर प्रेमीयुगुलाने विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दोघांच्या घरातल्यांना बोलावून घेत मंडपातच लग्न लावून दिले.

शहरातील संजय नगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज बाल गणेश मंडळ आहे. येथेच एक युवक युवतीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध जुळले होते. याची माहिती गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांना सुद्धा होती. गणपतीची आरती सुरू असताना हे प्रेमीयुगल तेथे आले होते. आरतीनंतर मंडळातील सदस्यांनी त्यांना लग्नाबाबत विचारणा केली असता प्रेमी युगलांनी सुद्धा होकार दिला. त्यानंतर दोघांच्यीही परिवारातील सदस्यांना मंडपात बोलावून घेतले. परिवारातील सदस्यांना त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती दिली. त्यांनी होकार देताच गणेश मंडपातच गणरायाच्या साक्षीने लग्न सोहळा पार पडला.
यावेळी मंडळातील रिजवान पठाण, लोकेश हिरवणे, मिथून पंढरे, लूमन साहू, अक्षय साहू, वैभव राऊत यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.